अध्यक्षांचे मनोगत
सन्माननिय ग्राहक सस्नेह नमस्कार…
संस्थापक अध्यक्ष या नात्याने आपणाशी सुसंवाद साधताना अत्यंत आनंद वाटतो कि, कुटे परिवार हा इ. सन. १९५० पासून ते आजतागायत बीड येथे विविध व्यवसायात काम करत आहे. त्यातीलच एक म्हणजे ज्ञानराधा मल्टिस्टेट को.ऑप. क्रेडिट सोसायटी ली. बीड. या संस्थेच्या माध्यमातून बँकिंग व सहकारी क्षेत्रात महाराष्ट्र, राज्यासह संपुर्ण देशभरात अग्रक्रमाने आगेकूच करत असतांना ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या स्वरूपात, आम्ही आमच्या सन्माननिय ग्राहकांना वेळोवेळी बँकिंगच्या मार्फत मदतीचा हात पुढे करून, होणा-या गैरसोयी टाळण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा मानस सातत्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व सामान्य व्यक्तींना बँकिंग व्यवहार सुलभतेने करता यावेत, या दृष्टिकोनातून सन २००६ मध्ये आम्ही ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी ची बीड येथे स्थापन केली. व १६ वर्षांपूर्वी आम्ही या संस्थेच्या रूपाने बँकिंग क्षेत्रात एक पाऊल ठेवले.
आज या संस्थेचे मुख्य कार्यालय हे बीड येथे संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये कार्यरत असून औरंगाबाद शहरामध्ये देखील संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये कोर्पोरेट ऑफिस हे कार्यरत आहे. याचप्रमाणे आज रोजी संस्थेच्या ४४ शाखेचा विस्तार करून या मार्फत ग्रामीण भागातील ग्राहकांना, तसेच व्यापारी वर्ग, नोकरदार वर्ग व सर्वसामान्य ग्राहकांना सेवा देण्याचे काम आम्ही करत आहोत व त्यास आपल्या सर्वांचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभत आहे त्या बद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार…
याबरोबरच मुख्य कार्यालय बीड येथून सर्व शाखेस वेळोवेळी सहकार्य व मदत करण्यात येते. व कॉर्पोरेट ऑफिस औरंगाबाद येथून सर्व शाखेतील ग्राहकांना फोन द्वारे संपर्क करून त्यांच्या शाखेतील व्यवहार करण्या बाबत ज्या काही अडचणी असतील त्या बाबत चर्चा करण्यात येते. व या नंतर त्या विभागाचे विभागीय व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक हे त्या शाखेतील ग्राहकांची त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन व्यवहार करण्या बाबत त्यांच्या असलेल्या अडचणी बद्दल चर्चा करण्यात येते. तसेच प्रत्येक शाखेच्या अंतर्गत कामकाजाची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद येथील कॉर्पोरेट ऑफिस ची ऑडिट टीम यांच्या मार्फत प्रत्येक महिन्याला शाखेस भेट देऊन शाखेची व शाखेतील प्रत्येक गोष्टीची बारकाईने अंतर्गत तपासणी करण्यात येते.
अशाप्रकारे आर्थिक मदतीची प्रेमळ सावली आपल्या सारख्यांना मिळावी म्हणून आम्ही सदविवेक बुद्धीने ज्ञानराधा मल्टीस्टेट या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट या संस्थेचे जाळे केवळ बीड जिल्हयापुरतेच सिमीत न ठेवता संपुर्ण महाराष्ट्र व इतर राज्यात देखील पसरविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. तसेच बँकिंग क्षेत्रातील सर्व अत्याधुनिक सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षम जलद व वैविध्यपूर्ण सेवा पुरविण्याचा व संस्थेतील ग्राहक समाधानी राहण्याचा हेतू साध्य करण्या करीता आम्ही सतत प्रयत्नशील असतो म्हणूनच संस्थेच्या ४४ शाखेतील सर्व, एकूण ५,२१,००० पेक्षा अधिक ग्राहक आज ज्ञानराधा संस्थेमार्फत बँकिंग सेवेचा लाभ घेत आहेत. तसेच आपल्या सर्वांच्या सहकार्याने मिळून एकूण ठेवी – रु.१७४५+ कोटी व एकूण कर्ज वाटप रु.१२२१+ कोटी एवढे उद्दिष्ट पूर्ण करून रु.२१०० कोटींच्या ठेवीकडे यशस्वी वाटचाल करत आहोत. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे सहकार्य व विश्वासाच्या पाठबळावर, आम्ही सदैव प्रगतीपथावर राहून सर्वाना एक चांगल्या प्रकारची बँकिंग सेवा पुरविण्याचे काम करुत, याची आम्हाला खात्री आहे.
धन्यवाद…!
श्री. सुरेश डी. कुटे
संस्थापक अध्यक्ष