ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.

मराठवाड्यातील सामान्य माणसा पर्यंत सुलभ आणि जलद बँकिंग सेवा पुरविण्या साठी तसेच त्याद्वारे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सन २००६ मध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी ची स्थापना करण्यात आली. आमच्या संस्थेचं मुख्य कार्यालय बीड येथे असुन छत्रपती संभाजीनगर येथे व्यावसायिक कार्यालय आहे.

बीड येथून सुरु झालेला ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी चा प्रवास आज पर्यंत संपुर्ण महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यात देखील पसरला आहे तसेच आम्ही या बँकेची सेवा सर्वत्र पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या असंख्य ग्राहकांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे ५१+ शाखांचा विस्तार आता पर्यंत झालेला असुन संस्थेतील ग्राहक समाधानी ठेवणे व त्यांना संस्थेमार्फत सर्व बँकिंग सेवा पुरवणे हेच ध्येय मानून आम्ही अखंडपणे कार्यरत आहोत आणि बदलत्या काळानुसार नवं नवीन तंत्रज्ञान वापरून सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा, सुविधा ग्राहकांना पुरविण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत.

आमचे
ध्येय, उद्धिष्ट आणि मूल्य

महाराष्ट्रातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील आघाडीच्या वित्तीय संस्थांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. च्या माध्यमातून आम्ही आमच्या मौल्यवान ग्राहकांना एक विश्वासू साथीदार म्हणुन नेहमीच मदतीचा हात देत आलो आहोत. आम्ही प्रेरणा, अखंडता आणि गुंतवणूक या तिहेरी मूल्यांनुसार कार्य करतो आणि त्यानुसार आमच्या सेवांद्वारे आपल्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच तत्पर राहतो.
प्रेरणा : आम्ही आमच्या ग्राहकांना नेहमीच आमची प्रेरणा मानतो
सचोटी : आम्ही आमच्या सर्व व्यवहारांमध्ये सचोटीनेच काम करतो
सहभाग : आमच्या सेवांद्वारे आपले समाधान करताना आम्ही प्रारंभिक ते अंतिमपर्यंतच्या सर्व टप्प्यात वैयक्तिकरीत्या लक्ष पुरवतो.

vision and mission

ग्राहकांचा अभिप्राय