आमच्या बद्दलश्री. सुरेश ज्ञानोबाराव कुटे
चेअरमन

चेअरमन संदेश

सन्माननीय ग्राहक,
सस्नेह नमस्कार !
बँकिंग व सहकारी क्षेत्रात महाराष्ट्र,राज्यासह संपुर्ण देशभरात अग्रक्रमाने आगेकूच करत असतांना ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून आम्ही आमच्या सन्माननिय ग्राहकांना वेळोवेळी बँकिंगच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करून होणा-या गैरसोयी टाळण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा मानस सातत्यने पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आपल्या सेवेत मल्टीस्टेट माध्यमातून बँकिंगच्या अथांग सागरात आर्थिक ठेवीचे थेंब जमा करण्यासाठी आपल्या सारख्या सुजान व जागृत ग्राहकांना आम्हाला समर्थ साथ देण्याचे आवाहन करीत आहोत. आर्थिक मदतीची प्रेमळ सावली आपल्या सारख्यांना मिळावी म्हणून आम्ही सदविवेक बुद्धीने ज्ञानराधा मल्टीस्टेट या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आहे. मल्टीस्टेट या संस्थेचे जाळे केवळ बीड जिल्हापुरतेच सिमीत न ठेवता संपुर्ण महाराष्ट्र व इतर राज्यात देखील पसरविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केलेले आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट या संस्थेची वाटचाल यशस्वी करण्यासाठी आपली साथ मिळेल याचा आम्हाला संपूर्ण विश्वास आहे. धन्यवाद !

Scroll to Top

CHOOSE YOUR STYLE

This plugin used cookie system. Choose a predefined color scheme here. These are some examples.

RESET STYLE